Posts

Showing posts from March, 2022

आर्थिक व्यवस्थापनाचे मापदंड तसेच समुदाय आधारित संस्थाचे आर्थिक कृति आराखडा या विषयावर सविस्तर असे प्रशिक्षण

Image
आर्थिक व्यवस्थापनाचे मापदंड तसेच समुदाय आधारित संस्थाचे आर्थिक कृति आराखडा या विषयावर सविस्तर असे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, (MSRLM) नांदेड यांच्या अंतर्गत 5 दिवसीय निवासी आदर्श प्रभाग संघाचे आर्थिक व्यवस्थापन प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे संपन्न. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष नांदेड मार्फत कृषि विज्ञान केंद्रातील उत्कर्ष लर्निंग सेंटर येथे दि.९ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान आदर्श प्रभाग संघ आर्थिक व्यवस्थापन निवासी प्रशिक्षण पार पडले...या प्रशिक्षणादरम्यान या अभियानाचे राज्य प्रशिक्षक श्री.शरद पवार यांनी प्रभाग संघामार्फत आर्थिक व्यवस्थापन कसे करावे,प्रभाग संघाचे आर्थिक उत्पादन-बचत,आर्थिक विमा-निवृत्ती,समुदाय आधारित संस्था द्वारे दिल्या जाणाय्रा आर्थिक सेवा,विमा जोडणी, आर्थिक समावेशन, प्रभाग संघाची आर्थिक उत्पादने व सेवा यांचा लेख्यावर होणारा परिणाम, आर्थिक व्यवस्थापनाचे मापदंड तसेच समुदाय आधारित संस्थाचे आर्थिक कृति आराखडा या विषयावर सविस्तर असे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास जिल्हा व्यवस्थाप...

पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीचा हात धरल्यास यश नक्की मिळतं- श्री.ज्ञानेश्वर बोडखे

Image
पारंपरिक शेती न करता आधुनिक शेतीचा हात धरल्यास यश नक्की मिळतं- श्री.ज्ञानेश्वर बोडखे कृषि विभाग आत्मा नांदेड यांच्या सहकार्यातून कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे कौशल्याधारित प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत शेतकरी मार्गदर्शन व संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अभिनव फार्मस क्लब पुणे चे प्रवर्तक श्री.ज्ञानेश्वर बोडखे व जलसाक्षरता केंद्र यशदा चे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक श्री.सुमंत पांडे हे होते. आपल्या मनोगतात श्री.बोडखे यांनी शेतकय्रांना कृषि विज्ञान केंद्राच्या सहकार्यातून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा विषमुक्त शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे वळण्यासंबंधी आवाहन केले. श्री.सुमंत पांडे यांनी ग्रामीण भागातून शहराकडे होणारे स्थलांतर ही चिंतेची बाब आहे ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,गावातले पाणी गावात व गावातला माणूस गावात राहीला पाहिजे या तत्वावर कामे करण्याबरोबरच पारंपारिक पिके,दुर्लक्षित कडधान्य,गळीऔधान्य यांच्या संवर्धनासाठी देखील प्रयत्न करण्याबाबत आवाहन केले. या संवाद कार्यक्रमास एस.बी.आय.चे जिल्हा व्यवस्थाप...

सावित्रीच्या लेकींचा सत्कार…..

Image
 सावित्रीच्या लेकींचा सत्कार….. सावित्रीच्या लेकींचा सत्कार. आज दि. 3 जानेवारी 2022, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त संस्कृती संवर्धन मंडळ संचलित, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी तर्फे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिसरातील महिलांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सौ. सुनंदाताई देशमुख यांचा परिसरातील महिलांच्या संघटन कार्याबद्दल तसेच ज्ञानदानाच्या कार्याबद्दल सौ. चंदना कळकेकर, सौ. बबीता कंदूरके, सौ. तारा सिद्धापुरे, सौ. तारा ठाकूर, सौ. प्रणिता कुलकर्णी व सौ. छबुताई बोडके या सावित्रीच्या लेकींचा सत्कार करण्यात आला. या वेळी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर अतिशय सुंदर गीतही सादर केले गेले. #SavitribaiPhule #maharashtra #SavitribaiPhuleJayanti #education

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेdतीचा स्वीकार करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत राहावे -डॉ.आरती वाकुरे

Image
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेdतीचा स्वीकार करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत राहावे -डॉ.आरती वाकुरे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेdतीचा स्वीकार करून आपले उत्पन्न दुप्पट करण्यासाठी प्रयत्नरत राहावे -डॉ.आरती वाकुरे जिल्हा रेशीम विकास अधिकारी नाबार्डच्या सहकार्याने तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम (CAT) अंतर्गत उत्कर्ष लर्निंग सेंटर, कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे तीन दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तुती लागवड व व्यवस्थापन, रोपवाटिका व त्याचे व्यवस्थापन, रेशीम बाल्य व प्रौढ कीटक संगोपन, तुती व रेशीम किटकावरील कीड व रोगाचे व्यवस्थापन, शेड मधील व्यवस्थापन इत्यादी विषयावर तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणा दरम्यान मौ. धनगरवाडी ता.नांदेड येथे प्रक्षेत्र भेट व शेतकरी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी रेशीम उत्पादक शेतकरी श्री अर्जुन पगडे यांनी त्यांचे अनुभव कथन केले यावेळी जिल्हा रेशीम अधिकारी व त्यांची टीम ही उपस्थित होती त्यांनीही काही प्रात्याक्षिके शेतकऱ्यांना करून दाख...